Mon, Nov 19, 2018 06:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिलोत्तर गावातील हत्याकांडप्रकरणी चार जणांना अटक

शिलोत्तर गावातील हत्याकांडप्रकरणी चार जणांना अटक

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 1:06AMनालासोपारा : प्रतिनिधी

वसईतील कामण गावातील माजी सरपंचाच्या हत्येप्रकरणी 4 जणांना अटक केली असून या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत आरोपीच्या नातेवाईकांसह तीन महिला पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. एका पोलिसाच्या प्रसंगावधानाने हा डाव उधळण्यात आला. या प्रकरणात वालीव पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. 

वसई पुर्वेच्या कामण परिसरातील शिलोत्तर गावात राहणारे माजी सरपंच बबन माळी (42) यांची जमिनीच्या वादातून सोमवारी सकाळी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. माळी यांचा व्यावसायिक मित्र महेंद्रसिंग ठाकूर याने आपल्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून ही हत्या केली. यावेळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. हत्येनंतर संतप्त झालेल्या जमावाने आरोपींचा बंगला आणि वाहनांची नासधूस केली होती तसेच भिवंडी कामण महामार्ग रोखून धरला होता. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गोळी झाडणारा प्रमुख आरोपी महेंद्रसिंग ठाकूर हा फरार झाल्यानंतर संतप्त जमावाने आपला मोर्चा त्याच्या घराकडे कुटुंबियावर वळवला आणि बंगल्यावर दगडफेक सुरू केली. 

याप्रकरणी सुनीता,सुशीला,जिजा बलराम,शिवशंकर ठाकूर उर्फ बचवा यांना  अटक केल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.