Sat, May 25, 2019 22:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : श्रीराम समुद्राच्या मुसक्या आवळल्या

ठाणे : श्रीराम समुद्राच्या मुसक्या आवळल्या

Published On: Mar 08 2018 4:16PM | Last Updated: Mar 08 2018 4:16PMबदलापूर : प्रतिनिधी

गेल्या वर्षभरापासून पोलिसांना चकवा देत असलेल्या श्रीराम समुद्रच्या मुसक्‍या ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या श्रीराम समुद्रला अटक झाल्याने सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागीदारांना दिलासा मिळणार आहे.

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुणे आणि ठाणे येथील सुमारे चार हजारहून अधिक गुंतवणूकदारांना श्रीराम समुद्र याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. यानंतर तो गाशा गुंडाळून पळाला होता. त्यामुळे अनेक ठेवीदार हे हवालदिल झाले होते. या विरोधात संघर्ष समिती स्थापन करून त्याचे नेतृत्व शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे हे करत होते. श्रीराम समुद्राच्या मुसक्या आवळून त्याला जेलमध्ये टाकावं अशी मागणी सातत्याने त्यांनी लावून धरली होती. अखेर त्यांनी आणि संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रीराम समुद्राच्या मुसक्या आवळल्यामुळे त्याने जमविलेली माया आणि ठेवीदारांचे बुडविलेले पैसे नेमके कुठे आहेत आणि ते परत कधी मिळणार याबाबत आता ठेवीदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 

संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला मोठे यश : शैलेश वडनेरे

संघर्ष समिती आणि आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या पाठपुराव्यामुळे श्रीराम समुद्रला अटक करण्यात यश आले आहे. श्रीराम समुद्र याच्या अटकेमुळे ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांनी त्याची कसून चौकशी करून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न करावेत.