Sat, Feb 23, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है 

'बिग बीं'ना तिच्या 'एक्‍झिट'ची चाहूल?

Published On: Feb 25 2018 8:11AM | Last Updated: Feb 25 2018 8:15AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवुडची हवाई गर्ल, चांदणी म्‍हणून चाहत्‍यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणार्‍या श्रीदेवीच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह चाहत्यांवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाआधी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी  ''न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!''  असं  ट्विट केले होते. यानंतर काही काळातच श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी आली. यामुळे श्रीदेवी यांच्या निधनापूर्वी कुटुंबियांनी अमिताभ यांना त्यांच्या हृदयविकाराचा झटका आल्याची किंवा निधनाची बातमी दिली होती का अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी आख‍री रास्‍ता, खुदा गवाह या सारख्या चित्रपटातून एकत्र काम केलं होते.

बॉलीवूडसह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाव्‍दारे शोक व्‍यक्‍त केला आहे. अमिताभ यांच्या ट्विटनंतर काही काळातच श्रीदेवीच्या निधनाची बातमी पसल्यानंतर सोशल मीडियावरही शोक व्‍यक्‍त करण्यात आला.