Sat, Jul 11, 2020 22:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पणजी मार्गावर 'शिवशाही' बस सुरू

मुंबई-पणजी मार्गावर 'शिवशाही' बस सुरू 

Published On: Dec 22 2017 5:27PM | Last Updated: Dec 22 2017 5:27PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर प्रवाशांना थेट गोव्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाने मुंबई-पणजी या मार्गावर 'शिवशाही' ही बस आज दि. २२ रोजीपासून सुरु करण्‍यात आली आहे.

सलग सुट्ट्याच्या काळात कोकण व गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना ही बस अत्यंत उपयुक्त असून केवळ रु. ९१३/- इतक्या माफक दारात अत्यंत आरामदायी वातानुकूलित सेवा 'शिवशाही' बसमध्‍ये उपलब्ध करून देण्‍यात आली आहे. ही बस मुंबई सेंट्रल येथून रोज संध्याकाळी ५.०० वाजता सुटणार असून पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, म्हापसा मार्गे पणजीला जाईल तसेच पणजीहून रोज संध्याकाळी ६ वाजता याच मार्गे परतीचा प्रवास करेल, तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.