Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : सायन पोटनिवडणुकीत पुन्‍हा भगवा

मुंबई : सायन पोटनिवडणुकीत पुन्‍हा भगवा

Published On: Apr 07 2018 2:34PM | Last Updated: Apr 07 2018 2:33PMमुंबई : प्रतिनिधी

पालिकेच्या सायन प्रतीक्षानगर प्रभाग क्रमांक १७३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्‍हा एकदा भगवा फडकला. शिवसेनेचे रामदार कांबळे यांनी काँग्रेस उमेदवार सुनील शेट्टी यांना ८४५ मतांनी पराभूत करत विजय मिळवला. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली.

या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे ६ हजार ६१६ मते मिळाली तर काँग्रेसचे सुनील शेट्टी यांना ५ हजार ६७१ मते मिळाली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेची अक्षरश: झोप उडाली होती. भाजपनेही शिवसेनेला या मतदारसंघात पाठिंबा दिला होता ज्यामुळे रामदास कांबळे यांचा विजय झाला. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस चौथ्या स्थानावर फेकली गेली होती.

पोटनिवडणूक निकाल 

शिवसेना ६६१६ 

कॉंग्रेस ५७७१ 

गौतम झेंडे (अपक्ष) ५४९

नोटा २३४  

शिवसेना ८४५ मतांनी विजयी

Tags : shivsena, sion