Sat, Sep 22, 2018 10:39



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला

दंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला

Published On: Jan 04 2018 11:33AM | Last Updated: Jan 04 2018 1:22PM

बुकमार्क करा




मुंबई : पुढारी ऑनलाईन

दलित संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान राज्यभरात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळी प्रकरणी शिवसेनेने सरकारला लक्ष्य केले. शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून राज्यातील परिस्थितीवर सरकारची भूमिका काय असा सवाल केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही अग्रलेखातून चांगला समाचार घेतला आहे.

वाचा : viral : कोणाचं काय तर कोणाचं काय

‘प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये.’ अशा शब्दात शिवसेनेकडून प्रकाश आंबेडकरांना सुनावण्यात आले आहे.

वाचा :जिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली, विलेपार्ल्यात जमावबंद(व्हिडिओ)

'सामना' अग्रलेख

* राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. निवडणूक लढवणे आणि सरकार व पोलिसांच्या मदतीने त्या जिंकत राहणे हेच एकमेव सरकारी कार्य बनते तेव्हा राज्यातील ठिणग्यांचा हा असा उद्रेक होतो.

* महाराष्ट्रात जातीय तणाव वाढला तर हे राज्य तोडू पाहणाऱ्यांचे फावेल. महाराष्ट्राचे हित ज्यांना पाहवत नाही त्यांनाच हे जातीय दंगे हवे आहेत, पण राज्याच्या फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे प्रकार आता रोजच घडू लागले आहेत. हवा बदलत आहे व बुडबुडे फुटत आहेत. भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दंगलीनंतर प्रत्येक राज्यकर्ता असे आदेश देतच असतो. त्यात नवे ते काय? पण दंगलखोर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात पडद्यामागून सूत्रे हलवीत आहेत व बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत याची कल्पना राज्यकर्त्यांना असायला हवी होती.

वाचा : कोल्‍हापुरात इंटरनेट सेवा बंद झाल्‍याची अफवा 

* संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान व मिलिंद एकबोटे यांची हिंदू एकता आघाडी यांनी मिळून भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो.

*मृताच्या नातेवाईकांना सरकारने दहा लाखांची मदत केली, पण गेल्या २४ तासांतील दंगलीने सरकारचे कोट्यवधीचे नुकसान झाले. सामान्य लोकांच्या गाड्या, घरांना, दुकानांना आगी लागल्या. त्यांचे नुकसान कोणी भरून द्यायचे?

वाचा पुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल 

* सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा.