Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाळासाहेब एक रोखठोक व्यक्तीमत्व

बाळासाहेब एक रोखठोक व्यक्तीमत्व

Published On: Jan 23 2018 11:32AM | Last Updated: Jan 23 2018 11:55AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून ज्यांचे निर्विवादपणे नाव घेतले जाते ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या हरहुन्नरी व्यक्तीमत्वामुळे त्यांनी  काला, पत्रकारिता आणि राजकारण यात आपला दबदबा निर्माण केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ‘मार्मिक’ मासिकातून त्या काळातील प्रस्थापीत राजकीय व्यवस्थेवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक टीका केली. नंतर याच प्रेरणेने त्यांनी १९६६ला स्वतःच्या राजकीय पक्ष काढला. शिवसेना काढण्यामागे प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसाच्या हक्काचा प्रश्न होता. त्यामुळे शिवसेनेने मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या नोकरीच्या प्रश्नावरुन आक्रमक आंदोलने केली. यामुळेच त्यांना मुंबईत मराठीच्या मुद्दयावर प्रचंड लोकप्रियता लाभली. त्यांची भाषण शैली आक्रमक आणि टोमण्यांनी भारलेली असायची. त्यांच्या भाषणात त्यांच्या व्यंगचित्रासारखाच मिश्कलपणा होता. त्यामुळेच त्याच्या भाषणाने  विरोधकही कधी दुखावले नाहीत. 

शिवसेनेने कालांतराने आपली स्टाईल बदलली त्यांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलने सुरु केली याच्यावर टीकाही झाली. पण, त्यांना जनाधारही मिळत गेला. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूत्वाची राजकीय भूमिका घेतली. बाबरी मशिद पाडल्यानंतर भाजपने देखील काधीही उघपणे हे आम्हीच केले असा दावा केला नाही. पण, बाळासाहेब ठाकरेंनी  जर हे शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला गर्व आहे, असे म्हणत याचे उघडपणे समर्थन केले.  

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर उसळलेल्या दंगलीचेही उघड समर्थन त्यांनी केले होते.  जे काही आहे ते रोखठोक असा त्यांचा स्वभाव होता. ८०च्या दशकात शिवसेनेवर काँग्रेसची बी टीम आहे म्हणून टीका केली जात होती. त्यांनी बऱ्याचवेळा आपल्या मुळ राजकीय भुमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यात प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसचे असुनही राष्ट्रपतीपदासाठी समर्थन देणे याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. कारण एनडीएचा सर्वात जुना मित्रपक्ष असूनही प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. 

या सर्व गोष्टींवरुन त्यांची राजकीय भूमिका पटो अगर न पटो बाळासाहेब ठाकरे व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून आजही महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली  आणि लोकप्रिय आहेत.