Fri, Apr 26, 2019 15:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणारला शिवसेनेचा विरोध हा ‘एक डीलचाच भाग’ : विखे-पाटील

नाणारला शिवसेनेचा विरोध हा ‘एक डीलचाच भाग’ : विखे-पाटील

Published On: Apr 23 2018 3:47PM | Last Updated: Apr 23 2018 3:47PMमुंबई : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध करणे हा  शिवसेनेत आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, “नाणार नाही देणार! ”. मग नाणारच्या ‘तहात’ काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

सेना-भाजपकडून कोकणवासियांची फसवणूकः धनंजय मुंडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की, मावळे विकले जात नाहीत. मावळे विकले जात नाहीत, हे खरे आहे. म्हणूनच तर शिवसेना आजवर टिकून आहे. पण आजचे स्वयंघोषित सेनापती मात्र विकले जातात, ही दुर्दैवाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहतात? असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा(व्हिडिओ)

सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता ‘डबल सेन्चुरी’ होत आली आहे,  आता तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न विखे - पाटील यांनी उपस्थित केला. 

नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही