Mon, Jul 13, 2020 02:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय राऊतांचा पियुष गोयलांशी रंगला 'सामना'!

संजय राऊतांचा पियुष गोयलांशी रंगला 'सामना'!

Last Updated: May 25 2020 2:32PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

राज्यावर कोरोनाच्या संकटाचे सावट पसरले असताना राज्यात श्रमिक रेल्वेवरून वादंग सुरू झाले आहे. स्थलांतरित मजूर, कामगारांना परराज्यांमधील मूळ गावी पाठविण्यासाठी विषेश रेल्वेची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाड्या कमी उपलब्ध होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढ्या रेल्वेगाड्या देतो, असे सांगत प्रवाशांची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीतून उत्तर दिले आहे. 

वाचा: सीएम योगींच्या 'त्या' निर्णयानंतर राज ठाकरेंकडूनही रोखठोक पलटवार!

नागपुरवरून१४ मे रोजी उधमपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती.आधी ट्रेन आणि नंतर माणसं जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले हे कृपया जाहीर करा. मग आता यादी कसली मागताय. असा सवाल करत तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करता हे विसरू नका, असे ट्विट करत राऊत यांनी गोयल यांना आठवण करून दिली. त्यांनी कालही पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला. 

वाचा:उद्धव ठाकरेंकडून रेल्वेची मागणी, लगेच रेल्वेमंत्र्यांकडून आव्हान, नंतर संजय राऊतांचा खोचक टोमणा!

राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी महाराष्ट्राने दररोज 80 रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वेकडून फक्त ४० रेल्वे  सोडण्यात येत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादात सांगितले. त्यानंतर संध्याकाळी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देत सोमवारपासून दररोज १२५ श्रमिक ट्रेन देण्याची रेल्वे मंत्रालयाची तयारी आहे, असे सांगितले. मात्र, त्यासाठी राज्यातील स्थलांतरीत मजुरांची यादी राज्य शासनाने दीड तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे द्यावे असे ट्विट केले. परंतु रात्री उशिरापर्यत राज्य सरकारकडून मजुरांची कोणतीही यादी आली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

वाचा:सीएम योगींच्या 'या' अजब फतव्याने राज्यातील उद्योगांची अडचण होणार?

या आरोप प्रत्यारोपानंतर पियुष गोयल आणि सत्ताधारींच्या चांगलाच वांदग निर्माण झाला आहे.