Wed, Jan 29, 2020 21:13



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे स्‍वप्‍नात बडबडायचो'

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच, असे स्‍वप्‍नात बडबडायचो'

Last Updated: Dec 10 2019 1:14PM

शिवसेनेचे नेते खासदार  संजय राऊत



नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव दिल्‍लीत सांगितला. राज्यात कोणाचे सरकार येणार, काय होणार याबद्दल कोणालाच विश्वास नव्हता. मी मात्र सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे म्‍हणायचो. एवढेच काय तर स्वप्नात देखील मी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे बडबडायचो, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे एकत्र स्नेहभोजन ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होत. यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा अनुभव सांगितला. 

या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदार व माध्‍यम प्रतिनिधी यांच्‍यासमोर दिलखुलासपणे मांडला.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. आता देशातील इतर राज्यातले नेते ही म्हणत आहेत की 'ये हमारे यहा भी हो सकता है. हा 36 दिवसांचा जो राजकीय खेळ होता, तो कमिटमेंटचा खेळ होता. शरद पवारांवर माझा पूर्ण विश्वास होता. शरद पवारांनी एकदा गोष्ट मनावर घेतली तर ते ती पूर्ण करतात यावर आमचा विश्वास होता.