Mon, Sep 24, 2018 04:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने विश्वासघात केला; पालघर उमेदवारीवरून मुख्यमंत्र्यांनी सुनावले

शिवसेनेने विश्वासघात केला; पालघर उमेदवारीवरून मुख्यमंत्र्यांनी सुनावले

Published On: May 08 2018 5:47PM | Last Updated: May 08 2018 5:57PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

दिवंगत माजी खासदार चिंतामण वानगा यांच्या मुलाची दिशाभूल झाली. पोटनिवडणुकीत शिवसेनेने वानगा यांच्या मुलाला उमेदवारी दिली. त्यांनी असे करायला नको होते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराजी व्यक्त केली म्हणाले. काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

वानगा यांच्या कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आपण नाराज झालो आहोत. वानगा यांची जागा त्यांच्या मुलालाच मिळाली असती. पण त्याची दिशाभूल करण्यात आली. शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपचा विश्वासघात करायला नको होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

वाचा: काँग्रेसला अंधारात ठेवून राजेंद्र गावित भाजपात

आम्हाला शिवसेनेकडून अपेक्षा आहेत. शिवसेनेने पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे समर्थन केले पाहीजे. भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे रहायला पाहीजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘पंतप्रधान’ जनता ठरवते

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना २०१९ च्या लोकसभेत निवडूण आलो तर पंतप्रधान होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. यावर ‘राहुल गांधींच्या म्हणण्याने कोणी पंतप्रधान होत नाही. पंतप्रधान जनता ठरवते’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.