Fri, Nov 16, 2018 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेनेकडून शिवाजी शेंडगें 

मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेनेकडून शिवाजी शेंडगें 

Published On: May 18 2018 4:58PM | Last Updated: May 18 2018 4:58PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई शिक्षक मतदारसंघ  निवडणुकीसाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

शिवाजी शेंडगे हे पेशाने शिक्षक असून गेली १८ वर्षे चारकोपच्या एकविरा विद्यालयात जुनिअर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

दरम्‍यान, शेंडगे यांनी १ मे पासूनच या निवडणुकीची तयारी सुरु केल्‍याचे बोलले जात आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवसाच्या निमित्‍ताने शेंडगे यांनी चारकोप, कांदिवली येथे १५०० शिक्षक्यांच्या शिक्षक सन्मान सभेचे आयोजन केले होते. मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरु केल्याची कुजबुज यावेळी उपस्थित शिक्षकांमध्ये मध्ये होती.