Thu, May 28, 2020 17:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिदंबरमच होते 'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक; शिवसेनेचे टीकास्त्र 

'चिदंबरमच 'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक'

Published On: Aug 23 2019 8:42AM | Last Updated: Aug 23 2019 8:56AM

file photoमुंबई : पुढारी ऑनलाईन

आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. सध्या अडचणीत सापडलेल्या चिदंबरम यांच्यावर शिवसेनेनेही निशाणा साधलाय. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. 'हिंदू दहशतवाद' या शब्दांचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे. चिदंबरम त्याच सीबीआयच्या कोठडीत पोहोचले. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत. राजशकट कसे चालते व हलते याचा अनुभव त्यांना आहे. आहे त्या परिस्थितीस सामोरे जाणे व स्वतःचा बचाव करीत राहणे हाच उपाय आहे, असेही नमूद केले आहे.

चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्यांचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत. ३५०० कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनक्स मीडिया व्यवहारात ३०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त ४.६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय? असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.