Wed, Jul 24, 2019 08:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'हेच का अच्छे दिन' पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

'हेच का अच्छे दिन'; शिवसेनेची पोस्टरबाजी

Published On: Sep 09 2018 3:50PM | Last Updated: Sep 09 2018 7:17PMमुंबई : प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहेत. वाढत्या महागाईस कारणीभूत ठरणाऱ्या इंधन दरवाढीच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. दिल्लीत व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही 'हेच का अच्छे दिन' अशी पोष्टरबाजी करत भाजप सरकारविरोधी वातावरणात रंग भरला आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वच थरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेना व युवसेनेच्या माध्यमातून मुंबईत ठिकठिकाणी ‘हेच का अच्छे दिन’ अशे पोष्टर झळकावले आहेत. शिवसेना भवन व अन्य महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पोष्टरवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या २०१५ च्या आणि २०१८ च्या किंमतीतील फरक दाखवत  शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.