Thu, Jun 27, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'नवनिर्माण शिवसेना'; चला चार घरं फिरुन येऊ या!

..मग, राज ठाकरेंनाच शिवसेनेत घ्या! : शिवसैनिक

Published On: Feb 12 2018 12:53PM | Last Updated: Feb 12 2018 12:53PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ईशान्य मुंबईत आयात शिवसैनिकांवरून निष्‍ठावंतात नाराजी पसरली आहे. पक्षात निष्‍ठावंत शिवसैनिकांना डावलून चार-पाच पक्ष फिरून आलेल्यांना पदे मिळत आहेत. ही नुसती शिवसेना नसून 'नवनिर्माण शिवसेना' आहे, पोस्‍टर मुंबईत लागले आहेत. तसेच यात राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना पक्षात घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही, असा प्रश्न उपस्‍थित केला आहे. 

माननीय बाळासाहेबांचा एक निष्‍ठावंत शिवसैनिक या नावाने लावलेल्या या पोस्‍टरवर शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीवरून नाराजी व्यक्‍त करण्यात आली आहे. 'पक्षाच्या नवनियुक्‍त पदाधिकार्‍यांच्या यादीवरून माझ्यासारख्या निष्‍ठावंत शिवसैनिकाच्या लक्षात आले की, संघटनेला निष्‍ठावंत नकोत. तर चार-पाच पक्ष फिरून येणारे हवेत, मग चला तर आपण सुद्धा चार घरं फिरून येवू या,' अशी फिरकी घेतली आहे. 

'ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी निवडलेले बरेचजण दुसर्‍या पक्षांत फिरून शिवसेनेत आले आहेत. त्यांनी संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून आलेल्यांना किंवा पक्षविरोधी काम करणार्‍यांना संघटनेची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होता की, या पदांच्या लायकीचे निष्‍ठावंत शिवसैनिक यावेळी पक्षात नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्यांना महत्त्‍वाची पदे बहाल केली आहेत,' असेही पोस्‍टरवर म्‍हटले आहे.

या पोस्‍टरवर इतर पक्षांतून शिवसेनेत दाखल होऊन पदे मिळालेल्यांची नावे देण्यात आली आहेत. यात बाबू दरेकर(उपविभाग प्रमुख) हे मनसेतून, विजय पडवळ(उपविभागप्रमुख) मनसे-भाजपातून, ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) मनसेतून, बाबू साळुंखे (शाखा प्रमुख) मनसे-राणे समर्थक, शिवाजी कदम (वय ६५) मनसे, नाना ताटेले (शाखा प्रमुख) राष्‍ट्रवादी-मनसे-भाजपा आणि शरद कोथरे(शाखा प्रमुख) मनसेतून यांची नावे लिहली आहेत.  

या पोस्‍टरमुळे शिवसेनेच्या गोठातील अस्वस्‍थता बाहेर आल्याचे बोलले जात आहे. 

No automatic alt text available.