Fri, Jan 18, 2019 03:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसैनिकांचा राज ठाकरेंना व्यंगचित्रातूनच टोला 

शिवसैनिकांचा राज ठाकरेंना व्यंगचित्रातूनच टोला 

Published On: Jan 26 2018 11:50PM | Last Updated: Jan 26 2018 11:50PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

२०१९ची निवडणूक आपण स्वबळावर लढू असे म्हणणार्‍या शिवसेनेला राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून जोरदार दणका दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंनीं काढलेल्या व्यंगचित्राला शिवसैनिकांनी व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला प्रत्युत्तर देणारी दोन व्यंगचित्रे शिवसैनिकांकडून सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येत आहेत. पहिल्या व्यंगचित्रात 'तिळगूळ घ्या गोड बोला!' 'अरे माझे सगळे लाडू गेले कुठे?' असा टोमणा मारणारे तर तर दुसर्‍या व्यंगचित्रात अंथरुण सोडण्याआधीच कार्यकर्ते पक्ष सोडतायत, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.