Fri, Feb 22, 2019 19:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसैनिकांकडून श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न

शिवसैनिकांकडून श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न

Published On: Dec 06 2017 8:03PM | Last Updated: Dec 06 2017 8:03PM

बुकमार्क करा

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील लाल चौकात विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला. दरम्यान, राष्ट्रध्वज फडकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना काश्मीर पोलिसांनी आज ताब्यात घेतले.

हा चौक अत्यंत संवेदनशील असून अनेकदा हा भाग हिंसाचारामध्ये होरपळून निघाला आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाहून राष्ट्रध्वज फडकवण्यात परवानगी देण्यात येत नाही. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावण्याचे आव्हान दिले होते. यामुळे तणाव निर्माण झाला होता.