Sun, May 26, 2019 19:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजपथावर असा अवतरणार शिवराज्याभिषेक!

राजपथावर असा अवतरणार शिवराज्याभिषेक!

Published On: Jan 22 2018 7:52PM | Last Updated: Jan 22 2018 7:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रजासत्ताक दिनी राजपथावर यंदा २३ चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार आहेत. यात दरवर्षीप्रमाणेच महाराष्‍ट्राच्या चित्ररथाचे मुख्य आकर्षण असणार आहे. महाराष्‍ट्राकडून राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. 

संरक्षण मंत्रालयाची आज दिल्‍ली येथे पत्रकार परिषद झाली. यात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तोफा, ध्‍वजधारी मावळे आदी प्रतिकृती असणारा महाराष्‍ट्राचा चित्ररथ पथसंचलनासाठी सज्‍ज झाला आहे, असे सांगितले. यावेळी चित्ररथासह मुंबईच्या भैरीभवानी ग्रूपचे कलाकार भूमिका साकारणार आहेत. 

राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांमध्ये महाराष्‍ट्रातील चित्ररथांचे नेहमीच वर्चस्‍व राहिले आहे. यावर्षी १४ राज्यांचे चित्ररथ या सोहळ्यात भाग घेणार आहेत. यात शिवराज्याभिषेकाचा चित्ररथही यावर्षी सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.