Wed, Jul 15, 2020 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वाट्टेल ते करेन'

'बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वाट्टेल ते करेन'

Last Updated: Nov 17 2019 1:14PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

विधानसभा निवडणुक निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर सेनेचाच नेता विराजमान होणार असा प्रबळ दावा केला आहे. यातच सेनेने आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्‍मृतिदिनानिमित्‍त आपल्या सोशल मीडिया पेजवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा काही भाग शेअर करत बाळासाहेबांना व्हिडिओमधून आदरांजली वाहण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये 'बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वाट्टेल ते करेन' असे ठाम मत उद्धव यांनी मांडले आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवे ट्विस्ट निर्माण झाले आहे.

शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेबांना आदरांजली वाहताना एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण आणि भावना आहेत. त्या व्हिडिओतून मी वाट्टेल ते करीन, पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करेन. विधानसभेवर भगवा फडकवीन, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

'मी जाणार आहे, जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलेलं त्यासाठी मी माझं आयुष्य वाहून टाकलं आहे. काय वाट्टल ते मी करीन, दिवस-रात्र मेहनत करीन, आकाश-पातळ एक करील. काय करायचंय ती एकही गोष्ट शिल्लक ठेवणार नाही. पण, मी बाळासाहेबांची एकही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, ही शपथ आणि वचन मी त्यांना दिलंय, असे उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओतील भाषणात म्हटले आहे.

तसेच, सर्वसामान्य मराठी माणूस, हिंदू आणि दिन-दुबळा हा शिवसेनेकडे आधार म्हणून बघतोय. शिवसेना हा पक्ष निवडणूक लढविण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काढला नाही. अन्यायावरती वार करण्यासाठी हा पक्ष आहे. विधानसभेवर भगवा फडकवल्यावरही ही जाणीव राहणार... अरे बाळासाहेबांनी हे पाहायला पाहिजे होतं, पण ते बघत राहणार आपल्या सर्वांच्या डोळ्यातून बघत राहणार.. आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच,'' असे ठाम मत उद्धव यांनी भाषाणात मांडले आहे आणि याच भाषणाचा व्हिडिओ सेनेने बाळासाहेब यांच्या स्मृतिदिनानिमीत्त फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 

त्यांच्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवे ट्विस्ट निर्माण झाले आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.