Mon, Jul 06, 2020 10:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्यांसमोर मी नतमस्तक : उद्धव ठाकरे

राम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्यांसमोर मी नतमस्तक : उद्धव ठाकरे

Last Updated: Nov 09 2019 5:20PM

उद्धव ठाकरेमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशाच्या राजकीय तसेच सामाजिक आणि धार्मिक पटलावर अत्यंत संवेदनशील असलेल्या अयोध्यामधील रामजन्मभूमी वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. अयोध्येतील अत्यंत संवेदनशील २.७७ एकर जागा रामलल्ला विराजमानला देऊन मुस्लिमांना अयोध्येमध्येच ५ एकर जागा देण्याचे आदेश दिले आहेत.

अयोध्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अनेक वर्षांचा वाद मिटल्याचा आनंद आहे. येत्या दोन ते तीन दिवसात शिवनेरीला, तर येत्या २४ तारखेला पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहे. हा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवणारा आहे. आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांनी बळ दिले. त्यामुळे त्यांची आज आठवण येत आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले...

राम मंदिरासाठी जे शहीद झाले त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो

आंदोलनात सहभागी झालेले काहीजण अजुनही आमच्यासोबत आहेत, त्या सर्वांना मानाचा मुजरा

या नव्या पर्वाचं आपण सर्वांनी चांगल्याप्रकारे स्वागत करूया

आनंद जरूर साजरा करा, पण वेडवाकडं काही करू नका

अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांचीही आठवण होते

लवकरच लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार, राम मंदिराच्या लढ्यात अडवाणींचे मोठे योगदान आहे

येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाईन. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल

तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलेलो. ही चमत्कार घडवणारी माती नेल्यानंतर मला विश्‍वास होता की ही माती चमत्कार घडवेल. आणि वर्षभराच्या आत हा निकाल  लागला

आज 9 नोव्हेंबर आहे. गेल्या 24 नोव्हेंबरला मी अयोध्येत गेलो होतो

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते

आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायला घाबरत होते, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी ते बळ त्यांना दिलं

सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे