Sun, May 26, 2019 12:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शीतल महाजन 'नऊवारी साडी'त करणार स्‍काय डायव्‍हिंग

शीतल महाजन 'नऊवारी साडी'त करणार स्‍काय डायव्‍हिंग

Published On: Feb 10 2018 10:20PM | Last Updated: Feb 10 2018 10:19PMठाणे : अमोल कदम

पॅरा जंपर ( स्काय डायव्हर) साहसी खेळात उत्तुंग भरारी घेत पद्मश्री शीतल महाजन मॅडम यांनी स्काय डायव्हर या साहसी खेळात भारतीय पहिला महिला असल्याचा मान पटकाविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची शान असलेली पद्मश्री शीतल महाजन यावेळी आपल्या मराठी संस्कृतीचे जतन राहावे. तसेच मराठी बाणा कायम रहावा याकरिता आता पर्यंत जगामध्ये कुणीच असा धाडस केला नसल्याने पहिल्यांदाच महाराष्ट्राची संस्कृती महिलांची नऊवारी साडीचा पेहराव म्हणजे चक्क नऊवारी साडी नेसून विमानातून जम्प करणार असल्याचा व्हिडीओ त्यांनी सर्वत्र शेअर केला आहे.

मराठी असल्याचा सार्थ अभिमान मनामध्ये घेऊन थायलँड देशातून स्काय सेंटर येथुन तेरा हजार फुटावरून रविवारी नऊवारी साडी नेसून जम्प करणार आहेत. आपली संस्कृतीचे जतन व्हावे तसेच मराठी पणा कायम परदेशातही टिकून रहावा याकरिता पद्मश्री शीतल महाजन या महाराष्ट्राची संस्कृती महिलांचा नऊवारी साडीचा पेहराव चक्क नऊवारी साडी नेसून विमानातून जम्प करणार आहेत. त्यामुळे रविवारी सर्वांचे लक्ष पद्मश्री शीतल महाजन यांच्या नवीन रेकॉर्डकडे लागणार आहे. आतापर्यंत कित्येक जागतिक, राष्ट्रीय रेकॉर्ड करणारी शीतल महाजन ही महाराष्ट्राच्या मराठी बाणाची संस्कृती कायम टिकून राहावी याकरिता पहिल्यांदाच नऊवारी साडी नेसून जम्प करणार असल्याचा व्हिडीओ त्यांनी थायलँड येथुन सोसिअल मिडियावर्ती शेअर केला आहे, रविवारी थायलँड देशाचे वातावरण देखील चांगले असेल तर सकाळी लवकरच महाराष्ट्राची इतिहासकालीन परंपरा आजही कायम ठेवत नऊवारी साडी नेसून विमानातून पद्मश्री शीतल महाजन यांच्या जम्प करण्याकडे सर्व भारतीयांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून महाजन याना या जम्प करिता शुभेच्छा येत आहेत.