Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंद्राणी मुखर्जीकडून पीटर मुखर्जीला घटस्फोटाची नोटीस

इंद्राणीकडून पीटर मुखर्जीला घटस्फोटाची नोटीस

Published On: Apr 27 2018 2:33PM | Last Updated: Apr 27 2018 2:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सहआरोपी आणि पती पीटर मुखर्जीलला घटस्‍पोटासाठी नोटीस पाठवली आहे. शीना बोरा हत्‍याकांड प्रकारणी इंद्राणी आणि पीटर दोघेही तुरुंगात आहेत तरीही शीना हिने स्पीड पोस्टने पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. 

पीटर मुखर्जीपासून सामंजस्यातून फारकत मिळवी असा उल्‍लेख इंद्रायणीने पाठवलेल्‍या नोटीसीत केला आहे.त्‍याबरोबरच स्पेन आणि लंडनमधील संपत्ती, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स आणि अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांमधील गुंतवणुक यात समान विभागणी करण्याची मागणी या नोटीसमधून केली आहे.  

१० नोव्हेंबर २००२ साली पीटर आणि इंद्राणी यांचे हिंदू पद्धतीने लग्न झाले होते. त्‍यामुळे घटस्फोटासाठी एकमेकांविरुद्ध  न्यायालयात अर्ज न करता सांमजस्याने घटस्फोट घेण्यात यावा असा उल्‍लेख इंद्राणीने पाठवलेल्‍या नोटीसमध्ये आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण
एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली.  इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय हे या हत्येत सहभागी होते.  शीना बोरा ही इंद्राणीला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. ऑगस्ट २०१५ मध्ये मुंबईपासून ८० कि.मी. अंतरावर रायगडच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. ड्रायव्हर श्यामवर रायला अटक झाल्यानंतर त्याने पोलिसांनी शीनाची हत्‍या इंद्रायनीनेच केल्‍याची माहिती पोलिसांना दिली. तसेच या हत्‍येत आपणही सहभागी असल्‍याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर इंद्राणीला अटक करण्यात आली. इंद्राणी आणि शीना बोरा यांच्यात संपत्तीवरून वाद निर्माण झाले होते, त्यातूनच तिची हत्या करण्यात आली.  
 

Tags : sheena bora murder case, indrani mukherjee, peter mukherjee