Sun, Apr 21, 2019 04:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चोरीस अटकाव केल्यावरून हत्या

चोरीस अटकाव केल्यावरून हत्या

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:52AMभिवंडी : वार्ताहर

भिवंडी शहरात चोरीस अटकाव केल्याचा राग मनात धरून पहाटेच्या सुमारास  धारदार शस्त्राने केलेल्या हल्यात एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. सरवर अन्सारी (30)  रा. गुलझारनगर, शांतीनगर असे मृताचे नाव असून त्याच्या बहिणीचा पती जखमी आहे. जखमीवर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही हत्या चोरी करताना रंगेहाथ पकडल्याने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

शांतीनगर परिसरातील गुलझारनगर येथील परिसरात सरवर अन्सारी हा आपल्या कुटुंबियांसह राहत असून सध्या पावसाळ्यात यंत्रमाग कामाला मंदी असल्याने तो  बहिणीचा नवरा आमिर अन्सारी रा. नुरी नगर याच्या सोबत हमालीचे काम करीत होता. आमिर अन्सारी व तो नुरीनगर येथून कामासाठी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले असता जब्बार कंपाऊंड परिसरात मागून आलेल्या इसमाने धारदार लोखंडी शस्राने सरवरवर वार केला. त्यानंतर आमिरवर सुध्दा हल्ला करून हल्लेखोर पळून गेले.  सरवरचा भाऊ मोहम्मद जाकीरअन्सारी याने जखमींना स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी सरवर मृत झाल्याचे जाहीर केले. तर आमिरवर उपचार सुरू आहेत.