होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठरवले तर बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात शक्य

ठरवले तर बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात शक्य

Last Updated: Jan 21 2020 6:27PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पुढच्या दोन वर्षात होऊ शकते. हे स्मारक जगातल्या पर्यटकांना भुरळ घालणारे असणार आहे. या स्मारकाला वेळ झाला आहे यासाठी आणखी वेळ जाऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच स्मारकाच काम २५ टक्के पूर्ण झाले आहे. अजून ७५ टक्के काम करायचे आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लोक जातात तसेच बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण झाल्यावर लोक येतील अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 

अधिक वाचा : ‘कडकनाथ’ घोटाळा : शेतकऱ्याची आत्महत्या

शरद पवार यांनी इंदू मिल येथील जागेला भेट दिली यावेळी ते बोलत होते. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम एका आंतरराष्ट्रीय संस्थेला देण्यात आल्याने यामुळे याचे काम उत्तमच होणार आहे. यांनी मनापासुन ठरवलं तर हे स्मारक दोन वर्षात पूर्ण होणे शक्य आहे. तसेच चैत्यभूमी आणि स्मारक पाहिल्याशिवाय कुणीही परत जाणार नाही असे स्मारक व्हायला हवे असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

अधिक वाचा : रत्नागिरी : पहिली आंबा पेटी दापोलीतून रवाना