Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाप रे..! चहावर एवढा खर्च : शरद पवार

बाप रे..! चहावर एवढा खर्च : शरद पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री कार्यालयातील चहा पानावरचा खर्च ऐकून आश्चर्य वाटले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला आहे. ते मुंबईत एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते. पवार म्हणाले, 'मी चारवेळा मुख्यमंत्री होतो. पण, चहावर झालेला इतका खर्च ऐकून आश्चर्य वाटलं.' अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. 

मुख्यमंत्री कार्यालयात चहापानावर वर्षाला चहावर 3 कोटी 40 लाख इतका खर्च होत आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसने मिळविलेल्या माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज 18,500 कप चहा प्यायला जातो, अशी धक्कादायक माहिती समोर येते. यावर संजय निरूपम यांनीही इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. निरूपम यांनी म्हटले आहे की, ग्रीन टी, लेमन टी ऐकला आहे. पण, मुख्यमंत्री सोन्याचा चहा पितात की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री कार्यालयात 'चाय पे खर्चा'

Tags : sharad pawar, BJP, tea scam in mantralaya, NCP, devendra fadnavis, Congress, sanjay nirupam


  •