Sat, Jul 04, 2020 15:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कोरोनाचा अर्थव्‍यवस्‍थेवर मोठा परिणाम होणार'

'कोरोनाचा अर्थव्‍यवस्‍थेवर मोठा परिणाम होणार'

Last Updated: Mar 30 2020 11:53AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरोना विषाणू विरोधातील लढाईत सर्वांची साथ देण्यासाठी व काही तुमच्‍या-आमच्‍या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार आज (ता.३०) फेसबुक लाईव्‍हच्या माध्‍यमातून संवाद साधला. यावेळी त्‍यांनी सरकारच्‍या सूचनांचे आपण पालन केले तर नक्‍कीर कोरोनावर विजय मिळवू शकतो असे सांगितले. तसेच कोरोनाचा देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर मोठा परिणाम होणार असल्‍याचे  सांगितले.  हे संकट मोठे आहे. जर सूचनाचे पालन केले नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा पवार यांनी  यावेळी जनतेस दिला आहे.

लोकांच्‍या प्रश्‍नांना उत्तर देताना शरद पवार म्‍हणाले की, लॉकडाऊन असताना मी देखील घरबाहेर पडलेलो नाही. तुम्‍ही देखील घराबाहेर पडू नका. तसेच स्‍वच्‍छतेची काळजी घ्‍या व सूचनांचे पालन करा. अजूनही काही लोक रस्‍त्‍यावर फिरताना दिसतात. पोलिसांवर कारवाई करण्‍याची वेळ आणू नका. यासोबतच आरोग्‍याकडे दूर्लक्ष करु नका.

त्यांनी कोरोनाने देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर मोठा परिणाम होणार असल्‍याचे म्‍हटले आहे. कोरोनावर आपण विजय मिळवणार असल्‍याचे देखील शरद पवार म्हणाले. आज आपल्‍या देशावर मोठे आर्थिक संकट आले आहे. उद्‍योगधंदे बंद असल्‍याने याचा परिणाम आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर होणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे,’ असे भाकित शरद पवार यांनी केले.सध्‍या राज्‍याला पुरेल एवढा अन्‍नधान्‍य साठा आहे. येत्‍या काही काळात नागरिकांना काटकसर करावी लागणार.

साठेबाजी करण्‍यार्‍यांकडून सरकात किंमत वसूल करेल. राज्‍य सरकार आहोरात्र झटत आहे. तसेच अशा संकाटाच्‍या काळात दवाखाने बंद ठेवणे ही बाब गंभीर आहे. यासोबतच अशा काळात काम करणार्‍या नर्स, डॉक्‍टर, आरोग्‍य कर्मचारी यांचे काम कौतुकस्‍पद आहे. ऊसतोड कामगारांची व्‍यवस्‍था करण्‍याचे आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी कारखानदारांना केले. सरकारची भूमिका संमज्‍यसपणाची आहे, दुबळेपणाची नाही, असे देखील यावेळी शरद पावार म्‍हणाले.   राज्‍यातील कोरोनाग्रस्‍तांची वाढती संख्‍या चिंताजनक आहे. त्‍यामुळे सरकारच्‍या सुचनांचे पालन करण्‍याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी नागरिकांना केले.सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा, सूचनांचे पालन करा,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले.

यावेळी खासरदार सुप्रिया सुळे देखील यांनी लोकांचे प्रश्‍न शरद पवार यांच्‍यासमोर मांडले व त्‍याच प्रश्‍नांची उत्तरे शरद पवार यांनी फेसबुक लाईव्‍हच्‍या माध्‍यमातून दिली.