Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंडमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुलुंडमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMमुलुंड : वार्ताहर

मुलुंडमध्ये एका साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ओळखीच्याच व्यक्‍तीने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली.  नवघर पोलिसांनी साहेब खान (26) याला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नवघर पोलीस करीत असून उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.    

 मुलुंड पूर्वेतील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या एका सुरक्षारक्षकाचे कुटुंब तात्पुरता निवारा बनवून राहत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हा सुरक्षारक्षक इथेच काम करतो. याच इमारतीचे बांधकाम करणारा कामगार साहेब खान  याची आणि या सुरक्षारक्षकाची ओळख होती. शनिवारी सायंकाळी आरोपी सुरक्षारक्षकाने साईडवर बनवलेल्या झोपडीत गेला. समोर खेळणार्‍या मुलीला पाहून तिच्या वडिलांना चहा आणण्यास सांगितले. चहा आणायला वडिल बाहेर जाताच नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कळूनही भितीमुळे सुरक्षारक्षकाचे कुटुंब गप्प राहिले. 

पीडित मुलीची आत्या मुलुंड पश्चिमेतील माला उपाध्याय यांच्या घरी घरकाम करते. त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर  समाजसेविका निशा रावल यांच्या कानावर माला यांनी ही घटना घातली.त्यानंतर पीडित मुलीला मुलुंडमधील सावरकर रुग्णालयात उपचारास दाखल केले. याची माहिती नवघर पोलिसांना दिली. नवघर पोलिसांनी तात्काळ आरोपीला मुलुंडमधून बेड्या ठोकल्या.  पीडित मुलीला उपचारासाठी तसेच तपासणीसाठी सायन येथील टिळक रुग्णालयात हलविण्यात आले आहे.