Tue, Jul 07, 2020 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : नाल्यात पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई : नाल्यात पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

Published On: Jul 15 2019 8:29PM | Last Updated: Jul 15 2019 8:29PM
मुंबई : प्रतिनिधी 

धारावीत क्र. १ उद्यानाजवळील राजीव गांधी कॉलनीत पिवळा बंगला परिसरातील एका नाल्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सुमीत मुन्ना जैसवार असे या मुलाचे नाव आहे. आज (सोमवारी) दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. 

गोरेगाव येथील नाल्यात पडलेला दिव्यांश सिंग हा मुलगा सहा दिवस झाले तरी अद्याप सापडलेला नाही. त्यानंतर वरळी येथे कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.