Tue, May 21, 2019 18:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरगावमध्ये सात हजार चौरस फुटांची महारांगोळी

गिरगावमध्ये सात हजार चौरस फुटांची महारांगोळी

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 15 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवारी गुढीपाडवा गिरगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे आणि स्वास्थ्यरंग तसेच रंगशारदा यांच्या सहकार्याने पर्यटन महाराष्ट्राचे संकल्पनेवर आधारित सात हजार चौरस फुट महारांगोळीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत माधवबाग पटांगण सीपी टँक येथे बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 

या वर्षीची यात्रा पर्याटन महाराष्ट्राचे या विषयावर आधारित असून यात्रेची असून यात्रेची संकल्पना अविस्मरणीय अनुभूतींची भ्रमंती महाराष्ट्राची अशी आहे. महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांचे दर्शन घडवण्याचा यावर्षी प्रतिष्ठानचा मानस आहे. यात्रेचा प्रारंभ सकाळी 8.00 वाजता गिरगावंतील फडके श्री गणेश मंदीरापासून महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त उप-सचिव अनुराधा गोखले यांच्या शुभहस्ते गुढी पूजनाने होईल, असे प्रतिष्ठानतर्फे संगण्यात आले. मूर्तिकार योगेश इस्वलकर यांनी साकारलेल्या 20 फूट ऊंच समर्थ रामदास स्वामी यांच्या हातात यात्रेची मख्य गुढी असेल. पर्यावरण रक्षनाचा विचार करून ही प्रतिकृती याही वर्षी कागदाचा वापर बनवण्यात येणार आहे.