Tue, Mar 26, 2019 11:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तांत्रिक बिघाडामुळे ठाणे-वाशी लोकल सेवा ठप्प 

तांत्रिक बिघाडामुळे ठाणे-वाशी लोकल सेवा ठप्प 

Published On: Jun 30 2018 1:22PM | Last Updated: Jun 30 2018 1:22PMठाणे : प्रतिनिधी

ठाणे ते ऐरोली दरम्यान रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर दुपारी साडेबाराच्या सुमारास तुटल्याने लोकल ठप्प झाल्या आहेत. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सुमारे अर्ध्या तासापासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशी लोकलमधून खाली उतरून पाई चालत प्रवास करत आहेत.

ठाणे, ऐरोली, घणसोली, रबाला, सानपाडा, तुर्भे आणि वाशी या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकल ठप्प झाल्याने खाजगी वाहनाने प्रवासी प्रवास करत आहेत तर काही प्रवाशी लोकल सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

रेल्वे कामगारांनी युद्ध पातळीवर काम सुरू केले असून सुमारे दीड तास ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरू होण्यास लागेल असे ठाणे रेल्वे स्थानक डायरेक्टर सुरेश नायर यांनी सांगितले आहे.