Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यावर दोन दिवस उभी असलेली वाहने होणार जप्त 

रस्त्यावर दोन दिवस उभी असलेली वाहने होणार जप्त 

Published On: Dec 11 2017 2:17PM | Last Updated: Dec 11 2017 2:17PM

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी 

रस्त्यालगत बेवारस पडलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने वाहनाला नोटीस चिकटवल्या नंतर 48 तासात वाहन न हटवल्यास ते वाहन जप्त करण्यात येणार आहे. यासाठी पालिका परिमंडळात प्रत्येकी एक याप्रमाणे 7 टोईंग गाड्या तैनात ठेवणार आहे.

मुंबईतील रस्त्यासह पदपथ व सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून, ती हटवण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या वाहन मालकांना धडा शिकवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2017 या दहा महिन्यात मुंबई शहर व उपनगरातून तब्बल 2235 गाड्या जप्त केल्या. यात 1295 दुचाकी, 245 तीनचाकी व 695 चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. आता बेवारसी वाहनांवरील कारवाई तीव्र करण्यासाठी मुंबईत सर्वे करण्यात येणार आहे. दरम्यान शहरात एखादे बेवारस वाहन आढळल्यास नागरिकांनी 1916 या हेल्पलाईनवर फोन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान जप्त केलेली वाहने दंड भरून एक महिन्यात सोडून नेण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र गाड्यांचा लिलाव करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.