Sun, Dec 08, 2019 19:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल : कामोठेमध्ये स्कोडाने ६ जणांना उडवले, दोन ठार 

पनवेल : कामोठेमध्ये स्कोडाने ६ जणांना उडवले, दोन ठार 

Published On: Jul 21 2019 9:56PM | Last Updated: Jul 21 2019 9:56PM
पनवेल : प्रतिनिधी 

येथील कामोठे वसाहतीमधील सेक्टर 6 मध्ये  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात  घडला. या अपघातात एका स्कोडा गाडीने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या 7 ते 8 वाहनांना धडक देत रस्त्यावरून चालणाऱ्या 6 जणांना गाडीखाली घेतले.  या भीषण अपघातामध्ये दोन स्थानिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश आहे.