होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संचमान्यतेसाठी आधारची अट काढली

संचमान्यतेसाठी आधारची अट काढली

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:32AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

शाळांची संचमान्यता करताना सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या माहितीसोबतच आधारकार्डची नोंदणी करण्यासाठी असंख्य अडचणी येत असल्याने ही अट काढावी अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली. ती अट शालेय शिक्षण विभागाने मान्य केली असून यावर्षी आधारची अट काढली आहे.

राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांची माहिती एकाच पटलावर नोंदविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने सरल ही प्रणाली सुरू केली. दर वर्षी 30 सप्टेंबपर्यंत सरल प्रणालीत नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळांची संचमान्यता निश्‍चित करण्यात येते; परंतु यंदा मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या माहितीसोबतच आधार क्रमांकाची नोंदणी करणे शाळांना अनिवार्य केली होती. ात्र अनेक विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालीच नसल्याने यामध्ये त्या विद्यार्थ्यांची नोंद करणे शाळांना अशक्य झालेले होते. 

अनेक विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणीच पूर्ण झालेली नाही. विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे शक्यच नसल्याने संचमान्यतेसाठी आधार कार्ड प्रमाण मानण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून केली होती.