Fri, Jul 03, 2020 00:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉकडाऊन ५.० मध्ये शाळा, महाविद्यालये उघडायची की नाहीत; केंद्राने घेतला 'हा' निर्णय!

लॉकडाऊन ५.० मध्ये शाळा, महाविद्यालये उघडायची की नाहीत; केंद्राने घेतला 'हा' निर्णय!

Last Updated: May 30 2020 8:22PM

file photo 

 

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मर्यादित करण्यात आला असून नियंत्रित भागात आधीप्रमाणेच ३० जूनपर्यंत काटेकोरपणे लॉकडाऊन पाळला जाईल, असे केंद्र सरकारकडून शनिवारी सांगण्यात आले. लॉकडाऊनबाबतची नवी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार आगामी काळात टप्प्याटप्प्याने व्यापार, उद्योगधंदे उघडले जाणार आहेत. 

वाचा : #Lockdown5 : धार्मिक स्थळे, हॉटेल्स, मॉल्स ८ जून नंतर होणार खुली 

सरकारने धार्मिक स्थळे, हॉटेल-रेस्टॉरंट, सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. ८ जूनपासून हे उद्योग नियम आणि अटींच्या अधीन राहून उघडता येतील. लॉकडाऊन ५.० मध्ये शाळा आणि महाविद्यालये उघडायची की नाहीत, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्राने राज्य सरकारांवर सोपविली आहे. जुलै महिन्यात राज्य सरकारे याबाबतचा निर्णय घेतील.

देशभरात रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येऊ-जाऊ शकतील. लोकांना त्यासाठी आता पास दाखविण्याची गरज राहणार नाही. लॉकडाऊन संदर्भातील सर्व नवे निर्देश १ जून ते ३० जून या कालावधीसाठी लागू असतील. नियंत्रित भागात केवळ अत्यावश्यक कामांसाठी मुभा देण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सवलत देत असताना चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सामाजिक दुरत्व पाळण्याचे निर्देशही गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. नियंत्रण क्षेत्राबाहेरील सर्व उद्योग धंदे येत्या एक महिन्याच्या काळात टप्प्याटप्प्याने उघडले जाणार आहेत.

लॉकडाऊन ५ मधील पहिल्या टप्प्यात ८ जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल-रेस्टॉरंट, सलून व शॉपिंग मॉल्स उघडता येतील. दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस उघडता येतील. मात्र यापूर्वी राज्य सरकारांशी चर्चा केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक, मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल्स, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आदीबाबतचा निर्णय परिस्थिती लक्षात घेऊन घेतला जाणार आहे.

वाचा : केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ५ ची घोषणा

ठळक वैशिष्ट्ये...
* एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येणार, यासाठी पासची गरज नाही. मात्र सामाजिक दुरत्व पाळावे लागणार
* आंतरराज्य मालवाहतूक तसेच लोकांना येण्या-जाण्याची परवानगी