Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत शाळकरी मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या

भिवंडीत शाळकरी मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 1:11AMभिवंडी : प्रतिनिधी

भिवंडी तालुक्यातील माणकोली नाका येथे राहणार्‍या 13 वर्षीय शाळकरी मुलीवर शेजारच्या दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार करून मुलीचा गळा आवळून तिला ठार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून नारपोली पोलिसांनी दोघा नराधमांना रात्री उशिराने चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

अर्चना विठ्ठल मिरस (13) असे बलात्कार करून ठार केलेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.ती अंजूरच्या विद्या मंदिर हायस्कूलमध्ये शिकत होती. ती सकाळच्या सत्रात शाळेत जावून दुपारी 12. 30 वाजता घरी आली होती. तर मोठी बहीण दहावीच्या वर्गात शिकत असल्याने ती दुपारच्या सत्रात शाळेत गेली होती.आईवडील दोघेही कामावर गेले होते. या दरम्यान अर्चना एकटीच घरी असल्याने दोघा नराधमांनी तिच्यावर पाळत ठेवून त्यांनी घरात प्रवेश केला व तिचे तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने आळीपाळीने तिच्यावर अमानुष बलात्कार केला.नराधमांच्या अत्याचाराने रक्तबंबाळ झालेल्या मुलीची गर्भपिशवीही शरीराबाहेर आल्याने बलात्काराची तीव्रता भयानक असल्याचे स्पष्ट होते.

त्यानंतर आपले बिंग फुटेल या भीतीने या नराधमांनी अर्चनाला गळा दाबून ठार मारले व बाथरूममध्ये फेकून निघून गेले. सायंकाळी मोठी बहीण शाळेतून घरी आल्यावर हा भयंकर प्रकार दिसताच तिने तो कामावर असलेल्या आईवडिलांना कळवला. त्यांनी घराकडे धाव घेत एकच टाहो फोडला.या बलात्काराच्या अमानुष घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील व सरपंचांनी देताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली व लगतच्या रूममध्ये राहणारे राहुल आणि चंदन या दोघांना ताब्यात घेवून चौकशी सुरू केली आहे.