Tue, Apr 23, 2019 06:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळा कुठे बंद तर कुठे सुरू; बनावट ट्विटने गोंधळ

शाळा कुठे बंद तर कुठे सुरू; बनावट ट्विटने गोंधळ

Published On: Jul 26 2018 1:35AM | Last Updated: Jul 26 2018 12:57AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा क्रांतीने पुकारलेल्या बंदच्या पाश्‍वभूमीवर सरकारी शाळा चालू राहिल्या मात्र अनेक खासगी शाळांनी सुरक्षेच्या कारणासाठी बंद ठेवल्या. संपाचा धसका पालकांनी घेतल्याने सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. त्यामुळे कुठे शाळा बंद तर कुठे सुरू असेच वातावरण दिवस राहिले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडीयात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बनावट ट्विटने शाळांमध्ये व पालकांत गोंधळ उडला. अखेर शिक्षण विभागाने ते ट्विट बोगस असल्याचे जाहीर करताच सुटीचा व्हायरल मेसेज थांबला.

मराठा समाजाने घोषित केलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत, तेथील स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे ंर्शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई बंद आंदोलनातून शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले असले तरी शाळा आणि महाविद्यालये बंदला मुंबई आणि उपनगरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर करण्यात न आल्याने शहरातील शाळा  व महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू झाली. केंद्रीय बोर्डाच्या तसेच खासगी शाळांनी सुरक्षेच्या कारणासाठी शाळा बंद ठेवल्या, तर काही शाळांत विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती दिसून आली तर काही ठिकाणी दुपारच्या सत्रात अनेक शाळा सोडून दिल्या.