Thu, Nov 15, 2018 03:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आनंदवार्ता: स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज झाले स्वस्त!

आनंदवार्ता: स्टेट बँक ऑफ इंडियाने दिले न्यू इअर गिफ्ट!

Published On: Jan 02 2018 9:37AM | Last Updated: Jan 02 2018 9:45AM

बुकमार्क करा
मुंबई : वृत्तसंस्था 

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) बेसरेटमध्ये कपात केल्याने गृहकर्जदारांसह शैक्षणिक कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. एसबीआयच्या सुमारे 80 लाख कर्जधारकांना याचा लाभ नव्या वर्षात मिळणार आहे. एसबीआयने बेसरेटमध्ये 0.30 पॉईंटनी घट केल्याने हा दर 8.65 टक्के झाला आहे. हा दर 8.95 टक्के होता.

गृह आणि शैक्षणिक कर्जे दीर्घ मुदतीसाठी दिली जातात. ही कर्जे बेसरेटशी निगडित असतात. त्यामुळे गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्जदार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या मासिक हप्त्यामध्ये घट होण्यास मदत होणार आहे. सध्या बाजारात अन्य बँकांच्या तुलनेत एसबीआयचे बेसरेट सर्वात कमी आहेत. रिझर्व्ह बँकेचे बेसरेटवर लक्ष असते. बेसरेटपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देण्यास आरबीआयच्या नियमानुसार बंदी आहे.

मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट (एससीएलआर) अंतर्गत अन्य कर्जदारांना लघु मुदतीसाठी कर्ज दिले जाते. एससीएलआरच्या व्याजदराचा महिन्याला आढावा घेतला जातो. या दरात तूर्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही.