होमपेज › Mumbai-Thane-Raigad › असल्फाची ‘सह्याद्री’ झोपडपट्टी ल्याली भरजरी साज

असल्फाची ‘सह्याद्री’ झोपडपट्टी ल्याली भरजरी साज

Published On: Jan 23 2018 1:59AM | Last Updated: Jan 23 2018 1:51AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

झोपडपट्टी म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती झोपड्यांची दाटी, अरुंद रस्ते, अस्वच्छ बोळ, आणि कळकट गल्ल्या. हे चित्र प्रत्येकाच्या मनात ठसलेलं आणि घट्ट झालेलं. पण घाटकोपरच्या असल्फा भागातल्या सह्याद्री 2 झोपडपट्टीनं हे चित्र पुसून काढलंय. कोणत्याही इंग्रजी चित्रपटाला शोभावं असं झगमगीत रूप तिला मिळालंय. हे चित्र आठवण करून देतं इटालियन पोस्टकार्डची. हा चमत्कार केला तो एका तरुणीनं आणि तिच्या स्वयंसेवी संस्थेतील सहकार्‍यांनी. विविधरंगी भिंती, भिंतीवर चितारलेली स्थानिक महिलांची, पशुपक्ष्यांची  चित्रे आता पर्यटकांचं लक्ष वेधून घेऊ लागली आहेत. रात्रीच्या वेळी विजेच्या प्रकाशात ही झोपडपट्टी डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडते.  

750 लोकांनी 400 लीटर रंग वापरुन ही झोपडपट्टी रंगवली आहे. ती केवळ मेट्रो प्रवाशांचेच लक्ष वेधून घेते असे नाही तर देशविदेशी पर्यटक एसएलआरसारखे महागडे कॅमेरे घेऊन या झोपडपट्टीचे 
आगळेवेगळे दृश्य साठवून घेत आहेत. नोव्हेंबरच्या मध्यात या झोपडपट्टीच्या रंगकामाला सुरुवात