Sat, Nov 17, 2018 06:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'त्या' मुलीने अपहरणाचा बनाव केला नाही

'त्या' मुलीने अपहरणाचा बनाव केला नाही

Published On: Mar 03 2018 3:02PM | Last Updated: Mar 03 2018 3:01PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

सानपाडा अपहरण प्रकरणात मुलीनेच बनाव केला असल्याची माहिती पुढे येत असली तरी त्यामध्ये सध्यातरी कुठेले ही तथ्य नाही.  ती मुलगी घाबरली असून तिची चौकशी करण्यासाठी साध्या वेशात पोलिस अधिकारी गेले होते. तिने  बाल कल्याण समिती पुढे आपला जबाब दिल्यानंतरच समिती काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून आहे.

पोक्सो कायद्यानुसार या गोष्टी पाळाव्या लागतात. तिने बनवा केला याला सध्यातरी कुठलाच पुरावा नसल्याचे एका उच्च पोलीस आधिकऱ्यांनी सांगितले. अजून ती मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आहे.  
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांना विचारले असता ते म्हणाले, बाल कल्याण समिती समोर जबाब घेतले जात आहेत. त्यामुळे मी आता यावर बोलू शकत नाही. 

अपहरण झाल्याचा बनाव स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशी कुठलीच कबुली मुलीने दिली नसल्याचे पोलीस सांगतात. सानपाडा येथून 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार शुक्रवारी संध्याकाळी सानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. 

ओमनी कारमधून आलेली व्यक्तींनी तिला पळवून नेल्याचे लहान भावाने घरच्यांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तातडीनं तपास करण्यास सुरुवात केली. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी पामबिच मार्गावर रस्तारोको करुन पोलिसांच्या तपासावर दबाव आणला होता. 

याचदरम्यान सदर अल्पवयीन मुलगी घटनास्थळापासून काही अंतरवरील मेडिकलमध्ये आढळून आली होती. चौकशीदरम्यान, अपहरणकर्त्यांनी वाशीमध्ये फेकल्याचे तिने पोलिसांना सांगितले. यानुसार तिची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली. 

अपहरणाचा बनवा खरा की खोटा समिती ठरवणार ?
राजस्थानमधील एका मुलासोबतची तिची मैत्री कुटुंबीयांना खटकत होती. त्याच्या सोबत मैत्री करू नको, असे कुटुंबीयांनी बजावल्याने तिने स्व:ताच्या अपहरणाचा बनाव रचला. यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे लहान भावाने कुटुंबीयांना अपहरणाची खोटी माहिती दिली. असे सांगण्यात येत असले तरी, हा निर्णय बाल कल्याण समिती देईल असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.