Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय निरुपम यांची जीभ घसरली, राज्यपालांबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य

संजय निरुपम यांची जीभ घसरली, राज्यपालांबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य

Published On: May 20 2018 9:09AM | Last Updated: May 20 2018 9:08AMमुंबई  : पुढारी ऑनलाईन

कर्नाटक विधानससभेच्या निवडणुकीत भाजपकडून १०४ जागा निवडून आणल्यानंतर राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजप राज्यातील मोठा पक्ष असल्याच्या निकषावर सत्ता स्‍थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस-जेडीएसने युती करून बहुमताचा दावा केल्यानंतर सत्ता स्‍थापनेची संधी देण्यात आली नाही. यानंतर भाजपचे अल्‍प मतातील सरकार कोसळले. भाजप सरकार कोसळल्यानंतर राज्यपाल वजूभाई यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूप यांनी टीका करतानात त्यांची जीभ घसरली आहे. वजूभाई वाला यांनी निष्ठावान, प्रामाणिकपणाचा नवीन विक्रम केला आहे. वजूभाई वाला यांच्या प्रामाणिकपणामुळे आता भारतातील प्रत्येक व्‍यक्‍ती आता आपल्या कुत्र्याचे नाव वजूभाई वालाच ठेवणार आहे. कारण वाला इतकं कुणीही प्रामाणिक असू शकणार नसल्याचे निरूपम यांनी म्‍हटले आहे. 

संजय निरुपम यांच्या वक्‍तव्‍यामुळे आता नव्‍या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्यपालांवर टीका केल्याने संजय निरूपम यांच्यावर जोरदार टीका होत आहे.