Thu, Apr 25, 2019 18:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सॅनिटरी पॅड वापरासाठी जागृती करा

सॅनिटरी पॅड वापरासाठी जागृती करा

Published On: Jan 17 2018 2:01AM | Last Updated: Jan 17 2018 12:56AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

राज्यात सॅनिटरी पॅडाचा होणारा वापर पहाता सर्वसामान्यांमध्ये त्याची जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करताना उच्च न्यायालयाने भारतीय बनावटीच्या सॅनिटरी पॅडाचा वापर कसा करता येईल तसेच जीएसटीमधून सवलत देण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात असे आदेश न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने राज्य सरकार तसेच महिला आणि बाल कल्याण खात्याला दिले.

मासीक पाळीच्यावेळी वापरण्यात येणार्‍या सॅनिटरी पॅडसाठी वस्तू व सेवा करातून (जीएसटी) सवलत द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका शेट्टी वुमन वल्फेअर फाऊंडेशन या समाजीक संस्थेन उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी याचिककर्त्यांनी मासीक पाळीच्यावेळी महिला स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड सारख्या उत्पादनांचा वापर करतात. देशात सुमारे 88  टक्के महिलाना सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात. त्यांना  जीएसटीच्या कराचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे असा दावा केला. याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. 

राज्यात  सॅनिटरी पॅड होणारा कमी वापर ही गंभर बाब आहे. सरकारने त्याबाबत कोणती पावले उचलली, असा सवाल केला. ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी पॅडचा वापर करण्यासाठी प्रचार, प्रसार करणे आवश्यक आहे. तसेच तेथील महिलांना पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे तसेच राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर  सेवाभावी संस्थांमार्फत जनजागृती करावी असे मत न्यायालयाने व्यक्त केले.