Sun, Mar 24, 2019 11:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या संदीप देशपांडेंना जामीन मंजूर

मनसेच्या संदीप देशपांडेंना जामीन मंजूर

Published On: Dec 07 2017 3:46PM | Last Updated: Dec 07 2017 3:50PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठही कार्यकर्त्यांची सत्र न्यायालयाने प्रत्येकी १५ हजारांच्या जामीनावर सुटका केली आहे.

या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येईपर्यंत प्रत्येक आठवडयाला पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जामीनाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होताच, गेले सहा दिवस जेलमध्ये असलेले देशपांडे यांच्यासह आठही जण कारागृहातुन बाहेर येतील.