Tue, Apr 23, 2019 00:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सेंट जॉर्ज’मध्ये पाच वर्षांची रुक्सार होणार मुलगा

‘सेंट जॉर्ज’मध्ये पाच वर्षांची रुक्सार होणार मुलगा

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील माजलगावातील पाच वर्षाच्या बालिकेवर आता लिंगबदलाची शस्त्रक्रिया मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात होणार आहे. ललिताला, जशी ललित साळवे ही हरवलेली ओळख परत मिळाली. तशी आपल्या मुलीलाही तिची खरी ओळख पुन्हा मिळेल, या आशेने त्या बालिकेचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले आहे.

पाच वर्षापूर्वी तिचा जन्म झाला. मुलीप्रमाणेच वाढवलं..पण, दोन वर्षांपूर्वी, कुटुंबीयांना धक्का बसला. रुक्सार मुलगी नसून मुलगा आहे याची त्यांना जाणीव झाली. काय करावं? कोणाला विचारावं? या विवंचनेत रुक्सारचे आई-वडील होते. पण, ललित साळवेच्या प्रकरणानंतर त्यांना धीर मिळाला. लिंगबदल शस्त्रक्रियेबाबत माहिती मिळाली. ललिताला, जशी ललित साळवे ही हरवलेली ओळख परत मिळाली. आपल्या मुलालाही त्याची खरी ओळख पुन्हा मिळेल, या आशेने बीड जिल्ह्यातील तिच्या कुटुंबीयांनी मुंबई गाठली आहे. मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात हार्मोन आणि ब्लड टेस्ट करण्यात आल्या. ही मुलगी नसून मुलगाच आहे हे स्पष्ट झाले आहे. लिंग योग्य पद्धतीने विकसित न झाल्याने लिंग बदल नाही तर लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्यांदा वैद्यकीय चाचणी केली तेव्हा  तिच्या शरीरात पुरुषांचे हॉर्मोन जास्त असल्याचे दिसून आले.

रक्त चाचण्या, हॉर्मोन टेस्ट, सोनोग्राफी सध्या करण्यात आली असून सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली. की, ललितच्या प्रकरणानंतर त्यांचे कुटुंबीय ललितला भेटले त्यांनी माहिती दिली त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला आहे.

 जन्मानंतर तीन वर्षांनी आईच्या लक्षात आले की मुलीमध्ये काही तरी समस्या दिसतेय. आम्ही बीडमधील डॉक्टरांना दाखवले  तेव्हा त्यांनी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला.  ती उभी राहूनच लघवी करायची. आम्ही कधी पाहिले तर ती पटकन बसायची. ललितच्या प्रकरणानंतर धीर आला. ललितच्या मदतीने आम्ही मुंबईत आलो. तेव्हा लिंग दुरुस्ती शस्त्रक्रियेनंतर मुलगी म्हणून वाढवल्या गेलेल्या या मुलाला मुलगा म्हणून जगता येईल, असा विश्वास डॉक्टरांनी दिल्याचे तिचे कुटुंबीयांनी माहिती देताना सांगितले.