Wed, Jan 23, 2019 19:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन-पनवेल महामार्गाचे खड्डे बुजवण्यासाठी नवी मुंबई पालिकेची मदत

सायन-पनवेल महामार्गाचे खड्डे बुजवण्यासाठी नवी मुंबई पालिकेची मदत

Published On: Jul 17 2018 6:44PM | Last Updated: Jul 17 2018 6:44PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

सायन पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आज नवी मुंबई महापालिकेकडे मदतीसाठी धाव घेतली. याबाबत बांधकाम विभागाच्या सचिवांसोबत महापालिका आयुक्त एन.रामास्वामी यांची चर्चा झाली असून मनुष्यबळ आणि साधनसामुग्री देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

सायन पनवेल खड्डे बुजवण्यास मदतीसाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सचिवांसोबत झालेल्या चर्चेनंतर पालिका आयुक्तांची भेट घेतली. या मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र मनुष्यबळ कमी पडत असल्याने व पावसाचा अडथळा येत असल्याने काम पूर्ण होत नाही. शिवाय बुजवलेल्या खड्ड्यातील कडी वाहून पुन्हा रस्त्यावर येऊ लागल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.   यावर पर्यायी तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत बांधकाम विभागाबरोबरच राज्याच्या मुख्य सचिवांनीही नवी मुंबई महापालिका आयुक्तांना खड्डे बुजवण्यासाठी मदत करा अशी सूचना केली.

यामुळे आता नवी  मुंबई महापालिका यंत्र सामुग्री आणि मनुष्यबळ पुरवण्याची तयार करत असून तसे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधीत विभागाला आणि शहर अभियंत्यांना दिल्याची माहिती पुढारीशी बोलताना दिली.