Thu, Jul 18, 2019 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपमरध्ये नाराजांची ‘नवनिर्माण शिवसेना’

घाटकोपमरध्ये नाराजांची ‘नवनिर्माण शिवसेना’

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 2:06AMघाटकोपर : वार्ताहर

शिवसेनेच्या ईशान्य मुंबई कार्यकारणीमध्ये आयाराम मनसे कार्यकर्त्यांची वर्णी लागल्याने सेनेत मोठी बंडाळी होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसैनिकांनी ‘नवनिर्माण शिवसेना’ या आशयाचे फ्लेक्स घाटकोपमरध्ये लावून राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाहीत? असा सवाल पक्षनेतृत्त्वाला विचारला आहे. 

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पदोन्नती मिळाल्याने अनेक निष्ठावंत शिवसैनिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. यामुळे घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. घाटकोपर पूर्व,  पश्चिमेत नाराजीचे फ्लेक्स दिसत आहेत. यामुळे उलट-सुलट  चर्चांना उधाण आले आहे. या फ्लेक्सवर पदाधिकार्‍यांच्या नियुक्‍तीबद्दल माहिती देण्यात आली आहे. बाळासाहेबांचा एक निष्ठावंत शिवसैनिक अशी शेवट असल्याने हे फ्लेक्स कुणी लावले हे मात्र गुलदस्त्यातच आहे.  

शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे. असेही नमूद करण्यात आले आहे. ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांचाही यावर स्पष्ट उल्‍लेख करण्यात आला आहे.

सध्या शिवसेनेत या  पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक नाही का, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. उपविभागप्रमुख बाबू दरेकर,  विजय पडवळ, विधानसभा संघटक ज्ञानेश्वर वायाळ, शाखाप्रमुख बाबू साळुंखे, शिवाजी कदम,  नाना ताटेले, शरद कोथरे आदींच्या नियुक्त्यांवर यात आक्षेप घेण्यात आला आहे.