Mon, Nov 19, 2018 23:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सनातनवरील बंदीबाबत आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट होती : चव्हाण

सनातनवरील बंदीबाबत आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट होती : चव्हाण

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 12:53AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

आघाडी सरकारच्या काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत स्पष्ट भूमिका होती व त्यामध्ये सातत्य होते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. 2008 साली ठाणे येथे झालेल्या बाँबस्फोटात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांवर दोषारोप सिद्ध होवून न्यायालयाने आरोपींना 14 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने या संस्थेबद्दल राज्य सरकारला अहवाल सादर केला. साकल्याने विचार करून 11 एप्रिल 2011 रोजी तत्कालीन आघाडी सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा अधिकृत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

सनातनवर बंदीचा प्रस्ताव डॉ. दाभोळकर यांच्या हत्येआधी पाठवण्यात आला होता. त्यामुळे, सनातन संस्थेवरील बंदी कोणत्याही समकालीन घटनेची प्रतिक्रिया नव्हती. याउलट दहशतवाद विरोधी पथकाने सातत्यपूर्ण तपासाने सादर केलेल्या अहवालावर आघाडी सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन सदर बंदीचा प्रस्ताव तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे सादर केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.