Fri, Jul 19, 2019 23:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रस्त्यांवरील खड्‍ड्‍यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे  मंत्रालयासमोर सर्जिकल स्ट्राईक  

रस्त्यांवरील खड्‍ड्‍यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे  मंत्रालयासमोर सर्जिकल स्ट्राईक  

Published On: Jul 17 2018 7:42AM | Last Updated: Jul 17 2018 11:28AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर ठिक ठिकाणी खड्डे पडलेले असतानाही त्याकडे संबंधित पालिका प्रशासन तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही. महापौर, संबंधित मंत्री एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्राल्यासमोर सर्जिकल स्ट्राईक आंदोलन करत रस्ता खोदला.

मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी पहाटेच्या सुमारास महाराष्ट्रात झालेल्या खड्डेयुक्त रस्त्यांचा जाहीर निषेध म्हणून मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा खोदून करून निषेध नोंदविला. जनतेप्रमाणे निष्क्रीय युती सरकारमधील मंत्र्यांनीही खड्ड्यांचा त्रास सोसावा हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे संबंधितांनी सांगितले. या प्रकरणीपोलिसांनी ४ मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे.