Sun, Mar 24, 2019 12:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...म्‍हणून रितेश देशमुख रायगडावर?

...म्‍हणून रितेश देशमुख रायगडावर?

Published On: Jul 06 2018 1:47PM | Last Updated: Jul 06 2018 1:49PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन

रितेश देशमुख याने रायगडावर जाऊन केलेले फोटोसेशन चांगलेच महागात पडले आहे. मेघडंबरीत फोटो काढल्याने नाराज लोकांनी सोशल मीडियावरून रितेशला तीव्र शब्दांत सुनावले. त्यानंतर रितेशने सोशल मीडियावरून वादग्रस्‍त फोटो मागे घेत माफीनामा दिला आहे. यात आपला कुणालाही दुखवायचा हेतू नसल्याचेही त्याने स्‍पष्‍ट केले आहे. 

रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी छत्रपती यांनी हा प्रकार निंदणीय ठरवत नाराजी व्यक्‍त केली आहे. खासदार संभाजीराजे यांनी २४ मे २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, किरण रिजिजू यांच्यासह अभिनेते आमिर खान, अजय देवगण, अक्षय कुमार, रितेश देशमुख यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दिलेलं हे चॅलेंज संभाजीराजेंसह ५ जूनला रायगड चढण्याचं  होतं. तेव्‍हा रितेश देशमुखने आपण परदेशात असल्याचं म्‍हटलं होतं. तसेच लवकरच आपण रायगडावर जाणार असल्याचेही सांगितले होते. 

 

Image may contain: 3 people, people smiling

शुक्रवारी (५ जुलै) रोजी रितेश देशमुख हा ‘पानिपत’कार विश्वास पाटील, दिग्‍दर्शक रवी जाधव आणि सहकार्‍यांसह रायगडावर गेला. परंतु, त्याने मेघडंबरीत जावून फोटो सेशन केले. मेघडंबरीत शिवाजी महाराजांप्रति आदर म्‍हणून कोणीही जात नाही. परंतु, रितेश आणि सहकार्‍यांनी याठिकाणी बसून काढलेले फोटो सोशल मीडियावर कुणालाही रुचले नाहीत. त्यामुळे रितेशला नेटकऱ्यांनी फैलावर घेतले आणि रितेशला माफीनामा द्यावा लागला.

अतिउत्‍साहामुळे माफी मागण्याची रितेशची दुसरी वेळ

रितेश देशमुख याची फोटो सेशनमुळे अडचणीत येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही २६/११ च्या हल्‍ल्यानंतर रितेश तत्‍कालिन मुख्यमंत्री व वडील दिवंगत विलासराव देशमुख, निर्माता राम गोपाल वर्मा यांच्यासह घटनास्‍थळी गेला होता. तेव्‍हाही हे प्रकरण रितेशसह विलासराव देशमुख यांच्याही अंगलट आले होते. या प्रकरणामुळे विलासराव देशमुखांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.