Fri, Jul 19, 2019 18:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबे पिकविणार्‍या केमिकलवर बंदी

आंबे पिकविणार्‍या केमिकलवर बंदी

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 26 2018 1:22AMनवी मुंबई: प्रतिनिधी 

मुंबई कृषी उत्पन्न घाऊक फळ बाजारात हापूस आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या इथरेल या बायर कंपनीच्या उत्पादनावर अन्न व औषध प्रशासन विभागाने बंदी आणली आहे. मंगळवारी ठाणे एफडीएच्या पथकाने अचानक एपीएमसी फळ बाजारात धाड टाकून व्यापार्‍यांकडील हापूसचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेवून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र या उत्पादनाला कृषी खात्याने परवानगी दिल्यानंतरच ते बाजारात विक्रीसाठी खुले केले अणि दुसरीकडे एफडीए कारवाई करत असल्याची माहिती घाऊक व्यापारी व संघटनेचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

10 फेबु्रवारी पासून कोकण हापुस आंब्याची आवक एपीएमसीत सुरु झाली. 10 फेबु्रवारी ते 25एप्रिलपर्यंत बाजारात 3 लाख क्विंटल हापूस आंब्याची आवक झाली. एपीएमसीत अडत्या गाळाधारकांची संख्या ही 990, बिगर गाळेधारक 401, अ वर्ग व्यापारी 112, व्यापारी 69, आयातदार दोन, निर्यातदार 69 आहेत. यापैकी निर्यातदार, मॉलधारक आणि मोठे व्यापारी हे रॅपिंग चेंबरचा वापर हापुस पिकविण्यासाठी करतात. या रेपिंग चेंबरमध्ये इथिलिन गॅसचा वापर केला जातो.

तर लहान व्यापारी हापुस पिकविण्यासाठी  बायर कंपनीचे कृषी खात्याने मान्यता दिलेले इथरेल या द्रव्याचा एकलिटर पाण्यात एक मिलि एवढा वापर करतात.  गेल्या कित्येक वर्षांपासून या द्रव्याचा वापर सुरु आहे. ते खुल्या बाजारात सरकारच्या परवानगीनेच विक्रीसाठी ठेवले आहे. मात्र अचानक एफडीएने या द्रव्यात ( इथरेल) असलेला इथोफीन हा घटक शरीरला अपायकारक असल्याचे सांगितले आहे. 

Tags : Mumbai,  ripen mangoes, chemical Ban, Mumbai news,