Tue, Jul 23, 2019 19:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवलीत दंगल भडकावल्याप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखाला अटक

कांदिवलीत दंगल भडकावल्याप्रकरणी शिवसेना शाखाप्रमुखाला अटक

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 29 2018 12:42AMमुंबई : प्रतिनिधी

कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा याठिकाणी यूथ ब्रिगेडच्या तरुणांनी काढलेल्या तिरंगा मोटार सायकल रॅलीमध्ये धुडघूस, मारहाण आणि जीवघेणा हल्ला करणार्‍या चारकोप विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 31 मधील शिवसेना शाखाप्रमुख लालसिंग राजपुरोहित ऊर्फ लालू याला कांदिवली पोलीसांनी दंगल घडवून आणल्याचा गुन्हाखाली अटक केली. तसेच त्याच्या इतर 10 साथीदारांनाही अटक करण्यात आली असून त्यांना 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा पोलीस चौकी येथून 100 ते 150  यूथ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा मोटार सायकल रॅली काढली होती. सदर रॅली आनंद नगर येथे आली असता,  येथील भूमी अपार्टमेन्ट याठिकाणी काही कामानिमित्त आलेल्या शिवसेना शाखाप्रमुख राजपुरोहित आणि त्यांच्या 25 ते 30 समर्थकांनी रॅलीतील तरुणांवर अचानकपणे चॉपरने हल्ला करून शिवीगाळ, तोडफोड आणि बांबूने मारहाण केली. यामध्ये आरोपी राम किशन चव्हाण उर्फ चूहॉ याने रॅलीतील तरूण पृथ्वी राजच्या मानेवर तर कुणाल गुप्ताच्या पाठीवर धारदार चॉपरने वार केले. तर प्रविण यास लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे कांदिवलीत कायदा सुव्यवस्था धोक्यात येवून नागरिक भयभीत झाले होते. 

अशा दहशतीच्या वातावरणात पोलीसांनी संयमाने भूमिका घेत घटनेतील मुख्य सूत्रधार आरोपी शिवसेना शाखाप्रमुख राजपुरोहितसह अश्‍विन गोहिल, रामकिशन चौहान ऊर्फ चूहा, हितेश अजानी, अजय यादव, सुरज गुप्ता, बध्दरा रप्पा या सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली. कांदिवली पश्चिम विभागात नेहमीच आपल्या पदाचा गैरवापर करत दहशत पसरवणार्‍या  शिवसेना शाखाप्रमुख लालसिंग राजपुरोहित याला अटक केल्याने स्थानिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.